
चिंचवड /पिंपळे गुरव (सुरज साळवे): ‘प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे।’ या घोषणांनी इंगनाईट फॉर क्राईस्ट चर्च पिंपळे गुरव मध्ये ईस्टर संडे उत्साहात साजरा झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळविल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ईस्टर संडे म्हणजेच पुनरुत्थान दिनानिमित्त विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि गायन करण्यात आले होते.अखिल मानवजातीसाठी मरण पत्करल्यानंतर येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाले. या भावनेतून ख्रिस्ती बांधवांनी सोहळा साजरा केला.महिला, पुरुष आणि लहान मुलांनी गिते गाऊन आनंद साजरा केला . चर्च पालक पा पंकज लालझरे यांनी मानवाच्या कल्याणासाठी येशूचे गौरवाने पुन्हा जिवंत होणे आवश्यक होते. प्रभूच्या दुसऱ्या आगमनाची प्रतीक्षा केली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. या वेळी चर्च मधील अमोल चंदन शिवे, सनी गायकवाड, राहुल साहू, प्रशांत कदम, अमित हिवाळे, शाम्युअल वाढागले,जयेश भानवल कर, संपदा भनवलंकर, अनुप बनसोडे, नितीन बनसोडे आदी तरुणांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले.चर्च परिसरात भोजनाची वेवस्था देखील केली होती सुनीता फर्नांडिस, शीतल कदम, कविता लालझरे यांनी आभार मानले.
